संत ज्ञानेश्वर !!
देवांनी सुद्धा भारतभूमीवरच जन्म घेतला. ही देवभूमीच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. संत हे चालते फिरते देवच मानले जातात. आपल्या देशात संतांना गुरू मानण्याची परंपरा आहे. गुरूचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीतच आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि समर्थ रामदास हे मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते आणि महाराष्ट्रधर्माचे संत होते. त्यांच्यामुळे आध्यात्मिक समता घडली. माणूस उभा राहिला तरच देश उभारेल, हे जाणून संतांनी जागृतीचे काम केले. तर जाणून घेऊया अशाच काही संतांबद्दल.
संत ज्ञानेश्वर
- संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ. स. १२७५ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळील आपेगाव या गावी झाला होता.
- भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी (१८ अध्याय, ओवी ९ हजार) १२९० साली नेवासे सच्चिदानंद यांच्याकडून लिहून घेतली.
- संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथसंपदेत अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, अभंगाची गाथा इत्यादींची भर पडली.
- इ. स. १२९६ मध्ये संत ज्ञानेश्वर यांनी संजीवन समाधी आळंदी येथे घेतली.

Comments
Post a Comment