संत तुकाराम

 संत तुकाराम -


संत तुकाराम हे सत्तराच्या शतकातील महाराष्ट्रातील एक वारकरी संत व कवी होते. त्यांचा जन्म देहू येथे झाला. संत तुकाराम यांच्या वडिलांचे नावा बोल्होबा व आईचे नाव कनकाई असे होते. त्यांच्या मोठ्यां भावाचे नाव सावजी व लहान भावाचे नाव कान्होबा असे होते. 

संत तुकाराम हे १७-१८ वर्षाचे असतानाच त्यांचे आईवडील निधन पावले व मोठा भाऊ तीर्थाटनाला निघून गेला त्यामुळे घरची सर्व जबाबदारी ही संत तुकारामांच्या अंगावरच होती. त्याचवेळी त्यांना भयंकर अश्या दुष्काळाला ही सामोरे जावे लागले. त्याच दुष्काळात त्यांचा मुलगा संतू हा देखील मरण पावला. त्यांच्या पत्नीचे नाव जिजाई ( आवली ) होते. 




" पंढरपूरचा विठोबा " हे संत तुकारामनाचे आराध्या दैवत होते त्यामुळे इतक्या वाईट परिस्थितीतही त्यांनी विठ्ठल्लाची भक्ती कायम ठेवली.

संत तुकारामांनी त्या वेळी अनेक अभंग केले व त्यांनी केलेले हे अभंग त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे हा कागदावर उतरवून घेण्याचे काम करीत असे. संत बहिणाबाई या संत तुकारामच्या शिष्या होत्या. संत तुकारामांनी संत बहिणाबाईंना "वज्रसूची" या ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले असे म्हंटले जाते.

इ.स.१९३६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीने "संत तुकाराम" हा चित्रपट बनविला व वेनिस चित्रपट उत्सवामध्ये या चित्रपटाला पुरस्कारही मिळाला.

संत तुकाराम यांना " जगद्गुरू " या नावानेही ओळखले जाते. म्हणूनच वारकरी कीर्तनाच्या शेवटी "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय " असा जयघोष करतात.

संत तुकाराम हे लोककवी होते. " जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणवा!" असे आपल्या अभंगातून त्यांनी जनतेला सांगितले.

संत तुकाराम महाराजांची ओळख ही महाराष्ट्रातील नर्भीड, वास्तववादी व वेळप्रसंगी समाजावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत अशी होती. ज्या दिवशी संत तुकाराम महाराज संदेह वैकुंठधामात गेले त्या दिवसाला " तुकाराम बीज " असे नाव पडले. असे हे " जगद्गुरू " संत तुकाराम आपल्या महाराष्ट्राला लाभले होते.

Comments

Popular posts from this blog

तुकडोजी महाराज भजन // प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ?

संत ज्ञानेश्वर !!