तुकडोजी महाराज भजन // प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ?

 प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ?

प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ? ।।धृ0।।
कुणाला भाग्य देवोनी, बसविले मंचकावरती ।
कुणी किति कष्ट जरि केले, तरी राहतात उपवासी ।।१।।
कुणाला झोपडी नाही, रहाया तिळभरी कोठे ।
तया मुल-बाळ बहु देशी, मजा बहु लांबुनी बघशी ।।२।।
कुणी करताति नवसाला, करोडो द्रव्य देवोनी ।
न देशी पुत्र एखादा, असा का भेद तुजपाशी ?।।३।।
कुठे हे दे, कुठे ते दे, न देशी सर्व कोणाला ।
सुखास्तव झूरती सारे, कळेना मार्ग कोणासी ।।४।।
म्हणे तुकड्या तुझी लीला, पहाता वेद‌ मौनावे ।
दीन अम्हि काय सांगावे, तुझी माया असे कैसी?।।५।।

Comments

Popular posts from this blog

संत ज्ञानेश्वर !!

संत तुकाराम